बोईंग ७३७ च्या प्रमाणीकरणाचे होणार अंकेक्षण
   दिनांक :20-Mar-2019
वॉिंशग्टन;
 इथिओपिया एअरलाईन्सच्या बोईंग ७३७ मॅक्स ८ ला झालेल्या अपघातानंतर या विमानाच्या प्रमाणीकरण प्रक्रियेचे अंकेक्षण करण्याचे आदेश अमेरिकेच्या वाहतूक सचिव एलाइन चाओ यांनी दिले आहेत.सर्वाधिक विक्री होणार्‍या या जेट विमानाच्या प्रमाणीकरण प्रक्रियेबाबत चौकशी करण्याचे आदेश अमेरिकी प्रशासनाने दिल्याचे सांगितले जात असतानाच चाओ यांनी हे आदेश दिले आहेत.
 
 
 
अदिस अबाबा येथून उड्डाण घेताच इथिओपिया एअरलाईन्सच्या बोईंग ७३७ मॅक्स ७ विमान कोसळल्याने ३५० जणांचा १० मार्च रोजी मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, या विमानाच्या दोन अपघातांमधील समान दुवा समोर आला आहे. यामध्ये विमानाने उड्डाण घेताच अपघात झाला होता. बोईंगने ७३७ मॅक्स ८ विमानासाठी जानेवारी २०१२ मध्ये संशोधित प्रमाणीकरणाची मागणी केली होती. मार्च २०१७ मध्ये त्यांना हे प्रमाणीकरण देण्यात आले, असे वाहतूक विभागाचे महानिरीक्षक क्लेविन स्कॉव्हेल यांनी पाठवलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे.
 
विमान प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेचा उद्देश आणि तपशीलवार वास्तविक इतिहासाचे अंकेक्षण करण्यात यावे, असे सांगण्यात आल्याची माहिती चाओ यांनी दिली.