होळीनिमित्त यवतमाळ ब्लड डोनर्स तर्फे रुग्णांना फळवाटप
   दिनांक :22-Mar-2019
 
यवतमाळ: सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष करुन रक्तदान चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणारी संस्था यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशन यवतमाळच्यावतीने होळी उत्सवानिमित्त्य वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
तसेच 21 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान रंगोवोत्सवानिमित्त भोजनाच्या कार्यक्रमाच्या भोजन पासचे वितरण रुग्णांच्या नातेवाईकांसाठी करण्यात आले. मागील 6 वर्षांपासून यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनच्या वतीने धुलीवंदनानिमित्त आगळेवेगळे उपक्रम राबवून होळी व रंगोत्सव साजरा करण्यात येतो.
 

 
 
संस्थेचा कोणताही पदाधिकारी या दिवशी होळीचे दहन न करता व रंग न खेळता होळी व रंगोत्सव साजरा करतात. येणारा खर्च आपसात चर्चा करुन संगनमताने धुलीवंदनासाठी या उपक्रमात खर्च करतात.
या प्रसंगी यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अर्गुलवार, उपाध्यक्ष किशोर पुनवंतवार, सचिव निलेश ताटीपामुलवार, प्रसिद्धी प्रमुख विजयकुमार बुंदेला, किशोर बोरा आदींसह ब्लड डोनर्स असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.