न्यूझीलंडमध्ये असॉल्ट रायफलच्या विक्रीवर बंदी
   दिनांक :22-Mar-2019
वेलिंग्टन:
 ख्राइस्टचर्च येथील एका मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूझीलंड सरकारने मोठा निर्णय घेत असॉल्ट रायफल आणि सेमी-ऑटोमॅटिक हत्यारांच्या विक्रीवर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी ही घोषणा केली. मशिदीतील हल्ल्यात वापरण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या सेमी ऑटोमॅटिक हत्यारांवर हा नियम लागू होईल असेही त्या म्हणाल्या.
 
 
याबरोबरच, उच्च क्षमता असलेल्या मॅगझीन आणि रायफलींद्वारे करण्यात येणारा गोळीबार अधिक तीव्र करणारे सर्व डिव्हाइस विकण्यावरही बंदी घालण्यात येत असल्याचे पंतप्रधान अर्डान यांनी जाहीर केले आहे. गेल्या शुक्रवारी न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथील दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात ५० लोकांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोर हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक होता.