'या' कारणामुळे सलमानने नाकारली वेब सिरीज
   दिनांक :22-Mar-2019
बॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणारा  सलमान खान याने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत अनेक नव्या चेह-यांना संधी दिली. लवकरच जहीर इक्बाल आणि प्रनूतन यांना सलमान लॉन्च करतोय. जहीर व प्रनूतनचा ‘नोटबुक’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. एका इव्हेंटमध्ये सलमानला त्याच्या डिजिटल डेब्यूबद्दल प्रश्न विचारण्यात आला. बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार्स वेब सीरिजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. त्यामुळे तू सुद्धा येत्या दिवसांत डिजिटल डेब्यू करणार का? असा हा प्रश्न होता. पण या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान स्वत:च्या डिजिटल डेब्यूबद्दल कमी अन् डिजिटल कंटेन्टवर अधिक बोलला.

 वेब सीरिज हे माध्यम चांगले आहे. पण माझे मत विचाराल तर वेब सीरिजच्या नावाखाली चाललेल्या बकवास गोष्टी मला अजिबात पसंत नाहीत. मला अलीकडे एका वेब सीरिजची ऑफर दिली गेली. पण मी त्यास नकार दिला. पुढेमागे मी सुद्धा वेबसाठी कंटेन्ट प्रोड्यूस करेल. पण ‘हम आपके है कौन’ टाईप. मी पूर्णपणे कौटुंबिक वेबसीरिज बनवणार, असे सलमान म्हणाला.