‘सॅटेलाइट शंकर’ची पूर्ण कमाई सूरज पांचोली देणार लष्कराला
   दिनांक :22-Mar-2019
 ‘हीरो’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला अभिनेता सूरज पांचोली हा मधल्या काळात चित्रपटांमध्ये झळकला नाही. त्यानंतर आता लवकरच तो ‘सॅटलाइट शंकर’ या चित्रपटात दिसणार असून ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे.  या चित्रपटाशी संबंधित आणखी उघड झाली आहे.
 

 
 
 
‘सॅटलाइट शंकर’ या चित्रपटातून होणारी संपूर्ण कमाई सूरजने लष्कराला देण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे शूटिंग चीन बॉर्डर जवळील हिमाचल आणि पंजाब येथे झाले आहे. या परिसरातील एका आर्मी कॅम्पला सूरज पांचोली त्याच्या या चित्रपटाची कमाई मदतनिधी म्हणून देणार आहे. सूरज पांचोलीचा ‘सॅटलाइट शंकर’ हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
सूरज पांचोलीचा ‘हीरो’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ‘सॅटलाइट शंकर’ चित्रपटात सूरज एका लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. देशाचे रक्षण करताना भारतीय सैनिकांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यासाठी सूरज पांचोलीने आर्मी कॅम्पला भेटही दिली होती.
 
चित्रपटाबद्दल सूरजने असे म्हटले की, ‘हा एक अविस्मरणीय प्रवास आणि अनुभव होता. जवानांना भेटणे, आम्ही कॅम्पच्या ठिकाणी शूटिंग करणे आणि जवानांच्या कुटुंबीयांना भेटणे हा एक अत्यंत आनंददायी अनुभव होता.’