हिंदू दहशतवादाचा बार फुस्स!
   दिनांक :23-Mar-2019
आसुरी, नकारात्मक तसेच देशविघातक शक्तींचे दहन करण्याचा प्रतीकात्मक दिन म्हणजे होळी. परंतु, या वर्षीच्या होळीच्या दिवशी, तीन गोष्टींबाबत खोटा प्रचार करणार्‍यांचे बुरखे गळून पडण्याची वेळ प्रथमच आली असावी. एक- नीरव मोदीला इंग्लंडमध्ये अटक झाली आणि तिथे त्याला जामीनही नाकारण्यात आला. नरेंद्र मोदींचे या नीरव मोदीला छुपे पाठबळ आहे, असा खोटा प्रचार सतत करणार्‍यांच्या तोंडात या घटनेने बोळा कोंबला गेला. दोन- समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद व इतर तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली. हिंदू दहशतवाद नावाचा एक नवा शब्द प्रचलित करून, जगासमोर हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न मातीत मिसळला. तीन- साबरमती एक्सप्रेसच्या डब्याला पेटवून त्यात ५९ निरपराध रामभक्तांना जाळण्याच्या घृणित कृत्यात सामील असलेल्या याकुब पटालियाला याच दिवशी शिक्षा सुनावण्यात आली. हा डबा हिंदू संघटनांनीच पेटविला होता, या कपोलकल्पित कहाणीच्या चिंध्या करणारा हा निर्णय आहे. खोट्या प्रचाराच्या देशविघातक ज्वाळांनी सत्य जळून खाक झाले नाही. उलट, प्रल्हादाप्रमाणे तेच या दहनकांडात सुरक्षित व लखलखून बाहेर निघाले आहे.
 
२००७ साली दिल्ली ते लाहोर दरम्यान धावणार्‍या समझौता एक्सप्रेसमध्ये पानिपतजवळ बॉम्बस्फोट झाले होते. यात ७० जण ठार झाले होते. हा बॉम्बस्फोट स्वामी असीमानंद व त्यांच्या साथीदारांनी केला, असा आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली. हे एक कारस्थान होते. परंतु, सोनिया गांधींना खुश करण्याच्या नादात सोनिया-दरबारातील लाचार, स्वत:चा आत्मा विकलेल्या खालमान्यांनी हे कारस्थान रचले. संयुक्त राष्ट्र संघाची सुरक्षा परिषद, अमेरिका आदींना, हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी घडवून आणला, याबाबत तिळमात्रही शंका नव्हती. फक्त पाकिस्तान आणि भारतातील तत्कालीन सोनिया गांधी सरकार यांना मात्र हे मान्य नव्हते. त्यांच्यामते हा स्फोट हिंदू दहशतवाद्यांनीच घडवून आणला होता.
 
 
 
जून २००९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ समितीने, या स्फोटात कराचीस्थित आरिफ कासमनी याचा सहभाग असल्यामुळे त्याच्यावर बंदी घातली होती. या समितीचे म्हणणे होते की, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित कासमनी, २००६ सालच्या मुंबईतील रेल्वे गाडीतील बॉम्बस्फोटाला तसेच २००७ सालच्या समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बस्फोटाला जबाबदार आहे. रेल्वे पोलिसांना सापडलेले परिस्थितिजन्य पुरावे पाकिस्तानी दहशतवाद्यांकडेच निर्देश करणारे होते. या स्फोटाच्या दुसर्‍या दिवशीच पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री खुर्शीद महमूद कासुरी, भारताशी शांतिवार्ता करण्यासाठी भारतात येणार होते. ते येण्याच्या एक दिवस आधीच हा स्फोट घडवून आणण्यात आला होता.
 
हे सर्वविदित आहे की, ज्या ज्या वेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळीत होण्याचे संकेत मिळतात, नेमके त्याच वेळी स्फोटासारखी कृत्ये करून, या शांतिवार्तेत विघ्नं आणली जातात. समझौता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोट त्याच हेतूने करण्यात आले असल्याचा जो निष्कर्ष काढण्यात आला होता, तो काही चूक नव्हता. सर्वत्र इस्लामी दहशतवादाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ उसळला. हे असले वातावरण त्यावेळच्या सोनिया सरकारला सहन झाले नाही. केवळ मुसलमानच नाही, तर हिंदूदेखील दहशतवादी असतात, असे सिद्ध झाले तर मुसलमानांविरुद्धचा जागतिक संताप निवळण्यास मदत होईल, असा ‘व्होट बँकीय’ विचार करून, २०१० साली या प्रकरणाला एक नवे वळण देण्यात आले. त्यानुसार, या स्फोटात मुसलमान सामील नसून, स्वामी असीमानंद व त्यांचे काही साथीदार सहभागी आहेत, अशी कहाणी रचण्यात आली आणि त्यानुसार असीमानंदांसह इतरांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) खटला दाखल केला. त्या खटल्याचा निकाल या होळीच्या दिवशी लागला आणि असीमानंद व इतरांविरुद्ध कुठलाच पुरावा सिद्ध होऊ शकला नाही म्हणून या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अशा रीतीने, हिंदू किंवा भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा सोनिया गांधींचा एक अत्यंत कुटिल डाव मातीत मिसळला. भारतमातेने सुटकेचा नि:श्वास टाकला असेल.
 
न्यायालयाच्या या निर्णयाने, दरबारी पत्रकार, इतिहासकार व बुद्धिवंत खवळले नसते तरच नवल! त्यांनी लगेच छाती बडविणे सुरू केले. असीमानंदांनी हा स्फोट घडवून आणला नाही म्हणजे हा स्फोट झालाच नसला पाहिजे. 70 जण मरण पावलेच नसले पाहिजे. इत्यादी अकलेचे तारे तोडणे सुरू झाले. या अशा प्रतिक्रिया देताना या मंडळींनी, 2010 पूर्वी या प्रकरणाला नवे वळण लावण्याआधी तपासाचे काय निष्कर्ष होते, याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले. ‘सिमी’च्या अतिरेकी शाखेचा प्रमुख सफदर नागोरी याने व त्याच्या काही साथीदारांनी नॉर्को-अॅनॅलिसिस परीक्षणात कबूल केले होते की, समझौता एक्सप्रेसमधील स्फोटात मुसलमान सहभागी आहेत.
 
असे असतानाही, केवळ हिंदूंना बदनाम करण्यासाठी, इतकेच नव्हे, तर जगभरात मुसलमानांकडे बघण्याचा तयार झालेला एक संशयी दृष्टिकोन मवाळ व्हावा म्हणून, ‘हिंदू दहशतवादा’ची कल्पना हवेत सोडण्यात आली होती, हे आता सिद्ध झाले आहे. सोनिया दरबारातील अत्यंत विश्वासू अशा काही पाताळयंत्री प्रभावी व्यक्तींनी हे सर्व कारस्थान रचले होते. हे करताना, आपण या देशाचे, या देशातील बहुसंख्य हिंदू समाजाचे किती नुकसान करीत आहोत, याचा थोडादेखील विचार यांच्या मनाला शिवला नसेल काय? आपल्या उदार मनोवृत्तीसाठी हजारो वर्षांपासून जगभरात प्रसिद्ध असलेल्या (आणि याच उदारमनस्कतेमुळे वारंवार संकटात सापडलेल्या) हिंदू समाजावर केवळ सत्ताप्राप्तीसाठी कायमचा कलंक लावण्यास यांना थोडीही लाज वाटली नाही!
 
सोनिया गांधींचे सरकार इतके पाताळयंत्री असतानादेखील, आपल्या खाजगी देवघरात देवासमोर तासन्‌तास नाक दाबून बसणारे, एरवी अत्यंत धार्मिक असल्याचा आव आणणारे अनेक हिंदू राजकीय नेते, पापमार्गाने कमविलेली आपली अफाट संपत्ती अबाधित राहावी म्हणून राजकीय वरदहस्त प्राप्त करण्यासाठी या बाईच्या मागे लाचारीने जाताना आपण आजही बघत आहोत. हिंदू समाजाची ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. राष्ट्रीय चारित्र्याचा लोप झाल्यामुळे या हिंदू समाजाला जे भोगावे लागले आहे आणि तो जे आजही भोगत आहे, तसे जगाच्या इतिहासात कुठेच घडले नसेल. इतके होऊनही, हिंदू समाजाचे डोळे उघडत नाहीत. हिंदू समाज असाच शेळपट असेल, तर मग गझनी, बाबरपासून ते इंग्रज आणि आता या बाई, यांचे काय चुकले म्हणायचे?
 
26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे या पोलिस अधिकार्‍याला दहशतवाद्यांनी ठार केले असतानाही, यात हिंदुत्ववाद्यांचाच हात होता, असे पुराव्यासह आरोप करण्यात आले होते. राज्याचे माजी पोलिस महानिरीक्षक शमसुद्दीन मुशरिफ यांनी ‘हू किल्ड करकरे?’ नावाचे ३०० पानी पुस्तक लिहून, देशातील दहशतवादाचा खरा चेहरा हिंदुत्ववादीच असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. कॉंग्रेसवाल्यांनी तर हे पुस्तक डोक्यावर घेतले होते. पण, नियती नेहमीच आपले फासे अदृश्यपणे फेकत असते. हे यांना कुणीतरी सांगायला हवे. म्हणूनच, इतका कांगावा करूनही हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचा कट यशस्वी झाला नाही. भारताची नियती काही वेगळीच आहे. पप