भावना गवळींचा नामनिर्देशन पत्र भरण्याचा मुहूर्त ठरला
   दिनांक :23-Mar-2019
 
 
यवतमाळ: यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवार भावना गवळी सोमवार, 25 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र भरणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. स्थानिक अवधूतवाडी व्यायामशाळा पटांगणातून सकाळी 11 वाजता नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी रॅलीला सुरुवात होणार आहे.
 

 
 
 
यावेळी पालकमंत्री मदन येरावार, शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, आ. राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक, प्रकाश डहाके, श्रीकांत मुनगिनवार, विजय जाधव, पुरुषोत्तम राजगुरू, नगरपरिषद अध्यक्ष कांचन चौधरी, वाशीम नप अध्यक्ष अशोक हेडा, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड  वाशीम जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, भाजपा नेते सुरेश लुंगे, नरेंद्र गोलेछा, यवतमाळ जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, डॉ. प्रवीण प्रजापती, शिवसेना यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, वाशीम महिला आघाडी प्रमुख मंगला सरनाईक, जिल्हा परिषद शिवसेना गटनेते श्रीधर मोहोड, दिगंबर मस्के, बाळासाहेब चौधरी यांच्यासह शिवसेना भाजपाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत.
ही रॅली अवधूतवाडी व्यायाम शाळा, दत्त चौक, नेताजी चौक, महादेव मंदिर या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचेल. केंद्रातील स्थिर सरकार, तसेच विकास या दोन प्रमुख मुद्यांवर ही निवडणूक लढण्याचा निर्धार शिवसेना-भाजपा युतीने केला आहे. या रॅलीमध्ये शिवसेना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.