आजचे राशी भविष्य, दि. २३ मार्च २०१९
   दिनांक :23-Mar-2019
 
 
 
 
 
मेष : आर्थिक नियोजन करताना सावध रहा. चित्त स्थिर ठेवा. कुणाशी भांडण करू नका. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांचे एका. गणपतीची आराधना लाभदायी ठरावी.
 
वृषभ : अनेक प्रकारचे लाभ आज तुमच्या राशीत आहे. येणी वसुल होतील. व्यवहारासाठी प्रवासाचे बेत आखावे लागतील. बोलण्यात अडकू नका. नामस्मरण केले तर झायदा होईल.
 
मिथुन : तुम्हाला हवे असलेले अधिकार प्राप्त होतील. महत्त्वाच्या कामांमध्ये सहभागी व्हाल. सुख तुमच्या दाराशी आलेले असेल. नाकासमोर पाहून चला. गायीला आज घास घाला.
 
कर्क : अनेक दिवसांपासून मनांत असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आजचा दिवस अत्यंत योग्य असा आहे. नवीन वस्तू खरेदी कराल. स्थावराचे व्यवहार करताना दक्षता घ्या. परदेशांतून योग्य तो संदेश आज नक्की येणार. निळा- आकाशी रंग आज लाथदायी आहे.
 
सिंह : तुम्ही रसायने आणि खनिजांच्या व्यवहारांत असाल तर आजचा दिवस अनेक महत्त्वाच्या घटनांचा आहे. आयुष्यभराची शिदोरी देणारा आजचा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. व्यवहार चोख ठेवा. आराध्य देवतेला अभिषेक करा.
 
कन्या : परदेशांत व्यवहार करण्याचा तुमचा मानस आज साकार होईल. वाहने चालविताना सावध रहा. कुणाच्याही फंदात पडू नका. धारधार वस्तूपासून सावध असा. लहानांना सांभाळा. देवपूजेत मन रमवा.
 
तूळ : कुटुंबात खूप दिवसांपासून असलेले वाद अचानक संपतील. सार्‍यांचे एकमत होईल. गैरसमज दूर कराल. मुद्रणाच्या व्यवसायांत फायदा आहे. लिखापढी करताना मात्र सावध रहा. सरस्वती स्तोत्र आजपासून सुरू करा.
 
वृश्चिक : कुठेही गुंतवणूक करताना सावध असणे नेहमीच आवश्यक असते. मात्र, आज डोळे झाकून पैसा गुंतवा. गृहलक्ष्मीचा सल्ला फायद्याचा ठरावा. मुलांचे लाड करू नका. तुमच्या राशीत गडद निळा रंग आज लाभदायी आहे.
 
धनू : तुमच्या मनांत असलेल्या योजना साकार करण्यासाठी आज अनेकांचे सहकार्य न मागता मिळेल. संकोच करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील. रात्री चंद्राची पूजा करा.
 
मकर : आज धाडसाचे निर्णय घेऊ नका. कुणालाही काही शब्द देवू नका. शेजारचे कामी येतील. घराजवळच्या मैदानांत काही घटना घडतील, दुर्लक्ष करा. वटवृक्षाची पूजा करा.
 
कुंभ : आज जवळचे नातेवाईक घरी येतील. दिवस आनंदात जाईल. चांगल्या वार्ता कळतील. वडिलधार्‍यांच्या औषधपाण्याकडे दुर्लक्ष करू नका. मुलांना सांभाळा. पाखरांसाठी दाणे आणि पाणी ठेवा.
 
मीन : व्यवसायात स्पर्धा असतेच, आज त्याचा सामना करावा लागेल. लोह, रंग, वस्त्र यांच्या उलाढालीत फायदा आहे. आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवाल. कुणालाही लागेल असे बोलू नका. कडधान्याचे दान मंदिराला द्या.