कपिलच्या शोचा टीआरपी घसरला
   दिनांक :23-Mar-2019
 
एकेकाळी टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या 'द कपिल शर्मा शो'च्या टीआरपीला सध्या उतरती कळा लागली आहे.   टीआरपीच्या यादीमध्ये ‘खतरों के खिलाडी’ हा शो पहिल्या स्थानावर आहे. तर कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ हा टॉप ५ मध्येदेखील त्याचं स्थान पटकावू शकला नाही. टीआरपीच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर लोकप्रिय ठरलेला ‘नागिन ३’ हा कार्यक्रम असून या कार्यक्रमात प्रत्येक वेळी येणारे नवनवीन वळणं प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.
 

 
 
 
या शोनंतर तिसऱ्या स्थानावर एकाच वेळी दोन कार्यक्रमांनी बाजी मारली आहे. ‘कुंडली भाग्य’ आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ हे दोन शो तिसऱ्या स्थानावर आहेत. तर चौथ्या स्थानावर एकता कपूरची ‘कसौटी जिंदगी की २’ हा कार्यक्रम आहे. तिसऱ्या स्थानाप्रमाणेच पाचव्या स्थानावरदेखील एकाच वेळी दोन कार्यक्रमांची वर्णी लागली आहे. त्यानुसार, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कुमकुम भाग्य’ हे कार्यक्रम आहेत. त्यानंतर सहाव्या स्थानावर ‘तुझसे है राबता’ आणि ‘सुपर डान्सर चॅप्टर ३’ या शोचा नंबर लागतो. विशेष म्हणजे या पहिल्या सहा क्रमांकांनंतर कपिल शर्माला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.