चीनमध्ये बसला आग लागून २६ पर्यटकांचा मृत्यू
   दिनांक :24-Mar-2019
बिजिंग:
 चीनमध्ये धावत्या बसला लागलेल्या आगीत २६ पर्यटकांचा होरपळून मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेस सांगितले. हुनान प्रांतात ही दुर्घटना घडली.  त्यामध्ये  ६४ जण मृत्युमुखी पडले होते.
 
 
दोन चालक, एक गाईड यांच्यासह ५६ जणांना घेऊन जाणार्‍या बसने महामार्गावर अचानक पेट घेतला. काही क्षणांतच संपूर्ण बसला आगीने घेरले. वेगाने आग पसरल्याने पर्यटकांना सुटका करून घेण्याची संधी मिळाली नाही. दुर्घटनेतून दोन्ही चालक बचावले असून, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. चीनमध्ये गुरूवारी एका रसायनांच्या कारखान्यात शक्तिशाली स्फोट झाला होता.