'तुला पाहते रे' मालिकेत होणार 'राजनंदिनी'ची एन्ट्री!
   दिनांक :24-Mar-2019
 
 
 
झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली 'तुला पाहते रे' या मालिकेत दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. विक्रांत आणि ईशाच्या प्रेमकहाणीने सुरुवात झालेली मालिका अल्पाधीतच टीआरपीच्या पहिल्या तीन स्थानकात पोहोचली आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातार हे यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांचीही केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. आता या मालिकेत 'राजनंदिनी' या पात्राची एन्ट्री होणार आहे. मालिकेच्या शिर्षक गीतात 'राजनंदिंनी'ची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते. मात्र, हे तिचे गुपित नेमकं काय याबद्दल प्रेक्षकांना आतुरता आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकर ही राजनंदिनीची भूमिका साकारणार आहे. राजनंदिनीच्या रुपात ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.