अफगाणमधील हवाई हल्ल्यात १३ नागरिक ठार
   दिनांक :25-Mar-2019
काबुल :
 
 
 
अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील कुंडूज शहरात तालिबान्यांना लक्ष्य बनवून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात १३ नागरिक ठार झाले. यात बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. या भागात अफगाणी फौजा आणि तालिबान्यांमध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. अतिरेक्यांच्या गुप्त अड्ड्यांची माहिती मिळाल्यानंतर ड्रोनच्या मदतीने या भागात अमेरिका आणि मित्र देशांनी हल्ले केले, पण लक्ष्य चुकल्याने नागरिक मारल्या गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली.