बुद्धू अकबर, हुशार बिरबल आणि चक्रीय शक्ती
   दिनांक :25-Mar-2019
म्यूच्युअल फंडवर बोलू काही 
दिलीप देवधर
९५६१६८८८८१
 
छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट होते, अफजलखान राष्ट्राचा-महाराष्ट्राचा शत्रू होता. राणा प्रतापिंसह ग्रेट होते, अकबर राष्ट्राचा शत्रू होता. अकबर मुसलमान नव्हता, तर दिने इलाही या संप्रदायाचा संस्थापक होता. अकबर सेक्युलर नव्हता. सेक्युलर म्हणजे इहवादी. बिरबल हुशार होता, पण त्याचा राजा अकबर बुद्धू होता. अकबर-बिरबलाची एक गोष्ट सांगतो-
 
‘‘मोगल सम्राट अकबरच्या दरबारात एकदा एक गणिती आला. त्याने काही हस्तलिखित ग्रंथ राजाला दाखविले. अकबराने ते ग्रंथ त्या विद्वानाला मागितले. विद्वानाने ते ग्रंथ राजाला दान केले. मोबदल्यात अकबराने त्या गणिततज्ञाला नजराणा द्यायची इच्छा व्यक्त केली. विद्वान म्हणाला माझ्या वंशजांनी अरबी राजाला काही गणिताचे ग्रंथ दिले होते. सध्या ते जगभर पोहोचले आहेत. माझे ताजे ग्रंथही जगभर पसरवा. अकबराने जरा जास्तच खूश होवून विद्वानाने अकबराला काहीतरी मागितलेच पाहिजे असे फर्मान काढले. त्यावर विद्वान म्हणाला- ‘‘आपली इच्छाच असेल तर मागतो. असे करा मला आज एक पोते धान द्या. उद्या दोन पोते धान द्या. परवा चार पोते धान द्या. त्यानंतर प्रत्येक दिवशी आदल्या दिवशीच्या दुप्पट धान देत जा.1,2,4,8,16,32,64... पोती. असे हयातभर धान देत रहा’’ अकबर म्हणाला- ‘‘माझ्या सारख्या ग्रेट सम्राटाला तुम्ही चिल्लर नजराणा मागत आहा. बिरबल तत्काळ राजाची आज्ञा खजिनदाराला कळवा.’’ बिरबल हुशार होता, त्याने अकबराला आज्ञा वापस घेण्याची विनंती केली. अकबराने बिरबलाला कारणमीमांसा विचारली.
  
 
हुशार बिरबल म्हणाला, ‘ हिंदुस्थानवर राज्य करणे सोपे आहे, पण बुद्धीने हरवणे अशक्य आहे. बादशहाला जीऑमेट्रिक प्रोगे्रशन समजलेले नाही, हे मी नम्रपणे लक्षात आणून देतो. आपली आज्ञा अमलात आणली तर लवकरच खजिना संपेल. जगातले संपूर्ण धान्य एक दिवशी दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी काय करायचे? 1 पोतं, 2 पोती, 4 पोती, 8 पोती, 16 पोती, 32 पोती, 64 पोती, 128 पोती, 256 पोती, 512 पोती, 1024 पोती, 2048 पोती, 1 कोटी पोती, 2 कोटी पोती, 1 अब्ज पोती, 2 अब्ज पोती...’’ सरतेशेवटी राजा अकबराने आज्ञा मागे घेतली.
 
जीऑमेट्रीक प्रोग्रेशन, कम्पाऊन्डेड ग्रोथ 
अर, आर धातुपासून आर्य शब्द तयार झाला. आर्य म्हणजे कृषी क्रांतिकारी. आर्यांनी गणितशास्त्र प्रगत केले. शून्य या संकल्पनेमुळे क्रान्ती झाली. 1,2,4,8,16,32,64 िंकवा 1,3,9,27,81,243 ही जीऑमेट्रीक प्रोग्रेशनची उदा. आहेत. व्याजावर व्याज हे चक्रीय व्याजाचे उदाहरण आहे. अर्थ-वित्त क्षेत्रात चक्रीय वाढ महत्त्वाचे समजतात. समृद्धीसाठी चक्रीय वार्षिक वाढ दर प्रतिशतमध्ये मोजतात. म्युच्युअल फंड उद्योग,बँक क्षेत्रात कम्पाऊन्डेड एन्यूअल ग्रोथ रेटची परिभाषा वापरतात. गत 40 वर्षात सेन्सेक्स 100 ते 39000 वाढला. गणिततज्ञ याला 16% चक्रीय वार्षिक वाढ दर या भाषेत मांडतात.
 
रुल ऑफ 72
6 टक्के सीएजीआरने 12 वर्षात (612=72) मुद्दल दुप्पट होते. 8 प्रतिशत कम्पाऊन्डेड एन्यूअल़ ग्रोथ रेटने 9 वर्षात (89=72) प्रिंसिपल दुप्पट होते. 12% चक्रीय वार्षिक वाढ दराने 6 वर्षात (126=72) िंप्रसिपल दुप्पट होते. 18% चक्रीय वार्षिक वाढ दराने 4 वर्षात (184=72) िंप्रसिपल अमाऊन्ट दुप्पट होतो. 24% सीएजीआरने 3 वर्षात (243=72) मुद्दल दुप्पट होते. वेदकाळातील विद्वान 72 या आकड्यास वृद्धी दर प्रतिशतने भागून ढोबळ मानाने मुद्दल दुप्पटीचा कालखंड तोंडी गणिताने सांगत असत. 20% चक्रीय वार्षिक वाढ दराने 3.6 वर्षात (203.6=72) मुद्दल, दुप्पट होईल, हे आपल्या लक्षात आले असेलच. हा फॉर्म्यूला ढोबळपणायुक्त आहे.
 
बारशाला 1 लाख रु. गुंतवा
मुलीच्या/मुलाच्या बारशाच्या दिवशी म्यु. फंडाच्या लिक्विड फंडात 1 लाख रु. गुंतवा. वर्षभरात सिस्टिमॅटीक ट्रान्सफर प्लॅनने संपूर्ण रक्कम 12 महिन्यात इक्विटी फंडात ट्रान्सफर करा. 32 वर्षांनी 1) 12%- 0.52 कोटी रु. 2) 13%-0.72 कोटी रु. 3) 14%-0.98 कोटी रु. 4) 15%-1.33 कोटी रु. 5) 16%- 1.80 कोटी रु. 6) 17%-2.43 कोटी रु. 7) 18%-3.27 कोटी रु. 8) 19%- 4.40 कोटी रु. 9) 20%- 5.90 कोटी रु. झालेले आढळतील. भूतकाळ, वर्तमानकाळ यांचा अभ्यास करून केलेला, हा भविष्यवेध आहे. भविष्यात काहीही होवू शकते, हे शहाण्या लोकांनी नेहमीच लक्षात ठेवावे.