आजचे राशी भविष्य, दि. २५ मार्च २०१९
   दिनांक :25-Mar-2019
 
 
 
मेष :  महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहे.
 
वृषभ : कौटुंबीक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहे. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावा. 
 
मिथुन : वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत. 
 
कर्क : आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. उत्तम आर्थिक स्थितीचा योग आहे.
 
सिंह : व्यवसायामध्ये प्रगती कारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकुलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
 
कन्या: मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
 
तूळ: सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायात अनुकुल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकुल ग्रहमान राहील.
 
वृश्चिक:  उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे.
 
धनू:   प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत.
 
मकर:  प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट, व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावे.
 
कुंभ:  नवीन संधी उपलब्ध होतील. पती-पत्नी मधील दुरावा कमी होईल. कौटुंबीक सौख्य लाभेल. 
 
मीन :  कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावे. सहकार्‍यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.