पाहा 'छपाक' चित्रपटाची पहिली झलक
   दिनांक :25-Mar-2019
मुंबई :
मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण ॲसिड हल्ला पीडितेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला आहे. ॲसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालवर आधारित 'छपाक' चित्रपटात दीपिका आणि विक्रांत मस्से मुख्य भूमिकेत आहेत. मालती असे दीपिकाच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे.
 
 
 
ॲसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही उल्लेखनीय आहे. स्थानिक दुकानांमध्ये ॲसिड आणि केमिकल्सच्या विक्रीविरोधात कायदा करण्यात अग्रवाल यांचा मोलाचा वाटा आहे.
 
 
'छपाक' हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होईल. फॉक्स स्टार स्टुडिओ, दीपिका पदुकोणचा 'के ए एन्टरटेनमेंट', मेघना गुलजारच्या 'मृगा फिल्म्स' यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'छपाक' चित्रपटाद्वारे दीपिका पदुकोण निर्मिती क्षेत्रातही  पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट असेल.