'तेजस' विमानामध्ये मलेशियाला रस
   दिनांक :25-Mar-2019
भारताच्या ‘तेजस’ फायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘तेजस’ हे भारताने विकसित केलेले स्वदेशी बनवाटीचे हलके लढाऊ विमान आहे. मलेशियामध्ये होणाऱ्या एअर शो साठी अन्य ५० विमानांसोबत तेजस क्वालालंपुरमध्ये दाखल झाले आहे.
 
 
दोन तेजस विमाने मलेशियातील एअर शो मध्ये सहभागी होणार असून आपले कौशल्य सादर करणार आहेत. मलेशियन एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांसह अन्य प्रेक्षक तेजसच्या क्षमतेने प्रभावित होतील अशी भारताची अपेक्षा आहे. २६ मार्चपासून हा एअर शो सुरु होणार आहे.
मलेशियन सरकारनेच जेएफ-१७, एफ/ए-५० या फायटर विमानांसह तेजसची निवड केली आहे असे क्वालालंपुरमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अनिरुद्ध चौहान यांनी सांगितले. जेएफ-१७ हे चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केलेले तर एफ/ए-५० हे दक्षिण कोरियाने विकसित केलेले फायटर विमान आहे