आजचे राशी भविष्य, दि. २६ मार्च २०१९
   दिनांक :26-Mar-2019
 
 
मेष : कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाण्याचा बेत आखाल.
 
वृषभ : लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि त्या प्रमाणे वागा. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरु करणे टाळा, गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या.
 
मिथुन : कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा.
 
कर्क : बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल - आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल.
 
सिंह : तुमचे घरगुती कामकाज, जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. त्यांच्या फुरसतीच्या वेळेत अशी काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस.
कन्या : तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही - परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत - तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल - तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस त्रासदायक ठरू शकेल.
 
तूळ : तुम्ही रागावाल असे वर्तन कुणी केले तरी तुम्ही तुम्ही रागावू नका. कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजिकच्या भव्यिात पश्चात्ताप करावा लागेल. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल.
 
धनु : घरासभोवतालचे किरकोळ बदल घराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतील. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल.
 
मकर : तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहका-यांवर तुम्ही वैतागाल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आर्थिक लाभ संभवतो. वाहन चालवतांना सावधगिरी बाळगा. कुल देवतेचे स्मरण करा.
 
कुंभ : जुन्या मित्र मैत्रिणीचा अचानक फोन आल्याने भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळेल. ताण आज कमी राहील. एकंदरीत दिवस मजेत जाईल.
 
मीन : घरातल्या ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी वाटेल. आज ग्रह नक्षत्र तुमच्या बाजूने असल्याने घाबरण्याचे कारण नाही. भविष्यातील खर्चांसाठी आजपासून आर्थिक नियोजन करा. भविष्यात अनपेक्षित खर्च संभवतो.