केसरीची कमाई पोहोचली १०० कोटींच्या जवळ
   दिनांक :26-Mar-2019
 
 
अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राच्या केसरी सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारचा केसरी चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून यंदाच्या ‘बिगेस्ट ओपनर’ सिनेमांच्या यादीत  ‘केसरी’ने पहिले स्थान मिळवले आहे. 
 

 
 
 
 जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर ‘केसरी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २१. ५० कोटींची दणकून कमाई केली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १६.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १८.७५ कोटींचा गल्ला जमावलाय. पहिल्या पाच दिवसात केसरीने ऐकूण ७८.०७ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच केसरी १०० कोटींच्या कल्बमध्ये सहज समाविष्ट होईल यात काही शंका नाही.