जनावरांची तस्करी करणा-या तीन वाहनांवर कारवाई
   दिनांक :26-Mar-2019
 
 
 29 बैलांची सूटका
आंधळगाव पोलिसांची कारवाई
भंडारा : जनावरांची अवैधरित्या तस्करी करणा-या तीन वाहनांवर आंधळगाव पोलिसांनी कारवाई करून 29 बैलांची सुटका केली.
पोलिस स्टेशन आंधळगावचे सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांना आज जनावरांची अवैध वाहतूक होणार
असल्याची माहिती प्राप्त झाली होती. माहितीच्या आधारे आंधळगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आंबागड मार्गावर पथक तैनात केले. यावेळी एकापाठोपाठ एक येणाऱ्या तीन वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये अत्यंत निर्दयतेने बैलांना कोंबून भरल्याचे दिसून आले. याप्रकरणी वाहन चालक आबीद अख्तर अन्सारी, इमरान युनूस शेख, गफूर कलीम अब्दुल पठाण सर्व रा.कामठी यांच्या विरूध्द आंधळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही वाहनामधून एकूण 29 बैलांची सूटका करून खैरी/पिंपळगाव येथील गौशाळेत पाठविण्यात आले.
 

 
 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, सहायक फौजदार संतोषसिंह सोलंकी, पोलिस नायक नंदेश्वर धुर्वे, शिपाई युवराज चव्हाण, सचिन नारनवरे यांनी केली.