‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या नावात पुन्हा बदल
   दिनांक :27-Mar-2019
अजय देवगणचा बहुप्रतीक्षित चित्रपट तानाजी पुढील वर्षांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता चित्रपटाच्या नावातही बदल करण्याचा विचार निर्मात्यांनी केला आहे. तिसऱ्यांदा हा बदल करण्यात येत आहे.
 
 
पूर्वी चित्रपटाचं नाव ‘तानाजी द अनसंग वॉरिअर’ असं होतं. (Taanaji: The Unsung Warrior) मात्र नंतर निर्मात्यांनी ‘तानाजी’ यांच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये बदल केले. बदल सुचवून Tanhaji : The Unsung Warrior असं चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं. मात्र आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला असून केवळ ‘ तानाजी’ या नावानं हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
 
न्यूमरोलॉजिस्ट भाविक संघवी यांच्या सल्ल्यानुसार नावात बदल करण्यात आल्याची माहिती एका मासिकानं दिली आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे तर या चित्रपटात सैफ अली खानही असल्याच्या चर्चा आहेत. हा चित्रपट डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र प्रदर्शनाची तारीखही बदलण्यात आली आहे. हा चित्रपट आता १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.