उन्हाळा आला त्वचा सांभाळा
   दिनांक :27-Mar-2019
फॅशनिस्टा
- सृष्टी परचाके 
 
न्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा टॅन होऊ शकते. सूर्यकिरणांमुळे त्वचा टॅन होत असून हातावर आणि चेहर्‍याच्या त्वचेवर काळे डाग पडण्याची शक्यता असते. तसेच बदलत्या हवामानाचा सुद्धा आपल्या आरोग्यवर थेट परिणाम होत असतो. शरीरात पाण्याची कमी झाल्यास याचा, सरळ परिणाम त्वचेवर होतो. उन्हाच्या तीव्र झळांमुळे केवळ रंगच नव्हे, तर त्वचेचा पोत खराब होणे, सावळी होणे, घाम-अस्वच्छतेमुळे त्वचेच्या रंध्रांमध्ये इन्फेक्शन होणे, त्वचा कोरडी पडणे किंवा त्वचेवर सुरकुत्या पडणे यासारख्या समस्याही होऊ शकतात. उन्हाळ्यात त्वचेला टवटवीत आणि मऊ ठेवण्यासाठी जास्त पाणी प्यावे. तसेच बाहेर जाण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रीन लावणे विसरू नये.
 
 
 
 
त्वचेत अनेक सूक्ष्म रंध्रे (छिद्रे) असतात. तुमची त्वचा जितकी स्वच्छ आणि मोकळी असेल तेवढेच त्वचेचे आरोग्य उत्तम असते. स्त्रियांनी उन्हाळ्यात शक्यतो गडद मेकअप करणे टाळावे. मेकअपमुळे त्वचेची रंध्रे ही बंद होत असल्याने त्वचेला कोरडेपणा येतो. हे टाळण्यासाठी मॉईश्चराईजरचा वापर करावा. हिवाळ्यातच नव्हे, तर उन्हाळ्यात सुद्धा त्वचेला मॉईश्चराईजिंगची आवश्यकता असते. गर्मीमुळे शरीरात पाण्याची कमी होत असून शरीर डिहायड्रेट होते. असे झाल्यास त्वचा कोरडी पडते. मॉईश्चराईजर लावल्याने त्वचेला सनबर्न आणि प्रदूषणापासून सुरक्षा मिळते. बाजारात विविध प्रकारचे मॉईश्चराईजर उपलब्ध असून नॉन ग्रीसी किंवा वॉटर आणि जेल मॉईश्चराईजरची निवड करावी. ग्रीसी मॉईश्चराईजर लावल्यास त्वचे वर धूळ बसू शकते. जीवनसत्व इ असलेल्या मॉइश्च्युराईजर चे निवड करावे. नैसर्गिक पद्धतीने सुद्धा त्वचे चे मॉईश्चराईजिंग करता येत असून ऑलिव्ह आणि बदामाचे तेल मॉईश्चराईजिंगसाठी उत्तम आहे. त्वचा कोरडी पडल्यास दुधाचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी चेहर्‍याला दूध लावल्याने कोरडी त्वचा मऊ होते.
 
फेस मास्क
उन्हाळ्यात त्वचेवर योग्य फेस मास्क लावल्याने चेहरा टवटवीत दिसतो. तसेच घरगुती पद्धतीने फेस मास्क तयार करता येतात. आठवड्यातून एकदा तासभर वेळ काढून वस्त्रगाळ चंदन पावडर २ चमचे, गुलाबपाणी २ चमचे आणि चमचाभर मुलतानी मिट्टी यांचे मिश्रण तयार करून त्याने फेशियल करावे. या मास्क मिश्रणामुळे त्वचा मऊ होते. पंधरा दिवसातून एकदा तरी उत्तम मसाज क्रिम आणून त्वचेला घरच्या घरी व्यवस्थितपणे मसाज करणे उन्हाळ्यात चांगले असते. मसाजमुळे त्वचेखालचे रक्तसंचालन उत्तम राहते. मसाज हलक्या हाताने करावी.
 
कोरफड जेल आणि सहद
त्वचेला चमकदार बनविण्यासाठी कोरफडचा वापर करावा. याचे मास्क तयार करण्यासाठी कोरफड जेल आणि सहद याला एकत्र करून घ्यावे. यानंतर ब्रशने हे मिश्रण चेहर्‍यावर लावावे. २० मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.
 
किवी आणि बदाम
निरोगी त्वचेसाठी बदाम उत्तम असून याचे फेस मास्क सुद्धा तयार करता येते. बदामाचे फेस मास्क लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात. हे मास्क तयार करण्यासाठी बेसन, किवी आणि बदामाची आवश्यकता असते. बदाम पावडर आणि बेसन एकत्र केल्यानंतर त्यामध्ये किवीचा गर टाकावा. हे तयार झालेले मिश्रण चेहर्‍यावर १५ मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवावे. हे मिश्रण आठवड्यातून दोनदा लावावे. चेहर्‍यावर पडलेले डाग या मिश्रणामुळे कमी होतात.
 
काकडी
दही, सहद आणि काकडी एकत्र करून मऊ मिश्रण तयार करून घ्यावे. हे मिश्रण चेहर्‍यावर १०-१२ मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवावे. काकडीचा फेस मास्क ड्राय त्वचेसाठी चांगला असतो.
 
टिप्स :
  • त्वचा उत्तम ठेवण्यासाठी तुमच्या त्वचेला अनुसरून योग्य ते क्रीम लावणे महत्त्वाचे आहे. तसेच उन्हातून फिरताना शक्यतो चेहर्‍याभोवती स्कार्फ गुंडाळावा आणि हातात स्किन्स घालावे.
  • उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त एसपीएफ (सन प्रोटेक्शन फॅक्टर) पुरेसे नाही. तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचविण्यासाठी ब्रॉड स्पेक्ट्रम सन प्रोटेक्शन लोशनचा वापर करावे.
  • फेशियल ऑईल्स देखील उन्हाळ्यात एक उत्तम पर्याय ठरू शकेल. लाईट वेट फेशियल ऑईल नैसर्गिक सीड ऑईल्सचे संमिश्रण असते.
  • उन्हाळ्यात एक बादली कोमट पाण्यात दोन थेंब लिंबाचा रस टाकून महिनाभर आंघोळ करावी. त्यामुळे त्वचेचा रंग साफ होतो.
  • मेकअप करणे गरजेचे असले तरी चेहर्‍यावरील सूक्ष्म रंध्रे मेकअपमुळे बंद होणार नाहीत, याची काळजी घ्या. तुमच्या त्वचेला श्वास घेऊ द्या आणि विशेष म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी हा मेकअप स्वच्छ धुवायला विसरू नका.
  • त्वचा चांगली राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.
  • मेडिटेशन आणि दीर्घ श्वसनामुळे मन शांत होते. रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे त्वचेवर एक वेगळेच तेज येते. दररोज १० मिनिटे दीर्घ श्वसन केल्यामुळे त्वचा टवटवीत राहते.