कपिल देवची मुलगी बनली दिग्दर्शक
   दिनांक :27-Mar-2019
दिग्दर्शक कबीर खान भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये जिंकलेल्या विश्वचषकवर आधारित '83' हा चित्रपट बनवत आहे. यामध्ये कपिलदेवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची सह दिग्दर्शिका कपिल देव यांची मुलगी अमिया आहे. भारताला १९८३ चा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव यांच्या मुलीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पाहण्यासाठी कपिल देव यांचे चाहते उत्सुकतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत.

 
कपिल देव स्वत: शूटिंगवेळी उपस्थित राहून रणवीर सिंगला क्रिकेटच्या टिप्स देत आहेत. संदीप पाटील यांचा मुलगा चिराग हा देखील या चित्रपटात दिसणार आहे. कपिल यांची मुलगी सह दिग्दर्शिका अमिया २३ वर्षांची आहे. मी मुंबईचा राहणारा असून अमिया दिल्लीची आहे. वयाने आमिया माझ्यापेक्षा खूप लहान असून या चित्रपटमुळे पहिल्यादाच आमची भेट झाली. ती रोज कबीरसोबत ऑफिसमध्ये असते आणि ट्रेनिंग सेशनमध्ये  भाग ही घेते, असे चिरागने या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले.
पुढील काही दिवस चित्रपटाचे संपूर्ण युनिट धर्मशाला येथे असेल. तिथेच संघाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील शूटिंगसाठी संपूर्ण यूनिट शूटिंगसाठी १५ मे रोजी लंडन,स्कॉटलंडसाठी रवाना होईल.