युद्धाचा धोका टळलेला नाही - इम्रान खान
   दिनांक :27-Mar-2019
भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये भारतातील निवडणुका पूर्ण होईपर्यंत तणावच राहील, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. पाकिस्तानच्या शेजाऱ्याकडून आणखी एखादे 'दु:साहस' होण्याची भीती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
'युद्धाचा धोका टळलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी आणखी एखादे 'दु:साहस' करण्याची शक्यता आहे. भारताकडून आक्रमण झाल्यास त्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे,' असे इम्रान खान यांनी म्हटल्याचे वृत्त पाकिस्तानातील 'डॉन' या वृत्तपत्राने दिले आहे.