अमेरिकेने घेतली ए-सॅट चाचणीची दखल
   दिनांक :28-Mar-2019
-अंतराळात होणार्‍या कचर्‍याबाबत व्यक्त केली चिंता
वॉिंशग्टन,
भारताने घेतलेल्या पहिल्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणीची अमेरिकेने दखल घेतली आहे. अंतराळात होणार्‍या कचर्‍याबाबत िंचता व्यक्त केली असली, तरी भारतासोबत अंतराळ आणि तांत्रिक सहकार्य कायम ठेवणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर अमेरिकी परराष्ट्र व्यवहार विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी झाल्याबाबत पंतप्रधान मोदी यांचे निवेदन परराष्ट्र व्यवहार विभागाने पाहिले आहे.
 

 
 
भारतासोबतच्या मजबूत धोरणात्मक भागीदारीचा एक भाग म्हणून आम्ही भारतासोबत अंतराळ, विज्ञान आणि तांत्रिक सहकार्यासोबतच अंतराळातील सुरक्षा आणि संरक्षणाबाबतचे सहकार्य कायम ठेवणार आहोत. मात्र, त्यांनी यावेळी अंतराळात होणार्‍या कचर्‍याबाबत िंचता व्यक्त केली.
 
अमेरिकी सरकारच्या दृष्टीने अंतराळात होणार्‍या कचर्‍याचा विषय अत्यंत काळजीचा आहे. अंतराळातील होणार्‍या कचर्‍याबाबत निवदेनात भारताने केलेल्या उल्लेखाची दखलही आम्ही घेतली आहे, असेही त्याने सांगितले.
अंतराळात कचरा निर्माण होऊ नये यासाठी भारताने लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रह नष्ट केल्याचे बुधवारी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले होते.