पोहे
   दिनांक :28-Mar-2019
 खाऊ गल्ली
 - प्रमोदिनी निखाडे 
  
पो
हे बहुदा न्याहारीत घेतला जाणारा पदार्थ आहे. पाहुण्यांच्या स्वागताकरिता किंवा मन जोडण्याच्या कार्यक्रमाकरिता या ना त्या निमित्ताने सर्वत्र ‘पोहे’ खाल्ले जातात. तसेच पोह्यांपासून विविध आणि उत्तम पदार्थ आणि तेही झटपट तयार होणारे आहे. खाणे आणि खाऊ घालणे हा नुसता छंद नाही, तर तो उत्कृष्ट व्यवसायदेखील आहे आणि पोहे हा सुरुवातीपासून त्यातलाच एक पदार्थ राहिला आहे. साध्या पोह्यांनी कित्येकांचे आयुष्य पालटले आहे, त्यांना आधार दिला आहे. पोह्याच्या याच प्रवासातील काही प्रकार आणि नवनवीन पदार्थदेखील आहेत.
 
तर्रीपोहे, दडपेपोहे, मुंबईचे कांदेपोहे, इंदोरी पोहे, शाही पोहे, इत्यादी पोह्यांचा आनंद स्थानिक स्थळावरच येतो. पण, आपण रोजच्या पोह्यांपेक्षा थोडे वेगळे असे टच देऊन त्यात रुचकर आणि काहीतरी नवीन अशी चव आपण चाखू शकतो. कटलेट, कबाब यासारखे खुशखुशीत पदार्थही पोह्यांपासून तयार होतात; तर व्हेजिटेबल चायनीज पोहा, पोहा दोसा, पोहा अप्पे, पोहा सांबार, पोहा चाट, पोहा पराठा, पोहा टिक्की इत्यादी अनेक आगळेवेगळे रुचकर पदार्थ आपण तयार करू शकतो. ज्याची उत्तम चव आणि झटपट रेसीपी य्या पदार्थांची एक वेगळी छटा दर्शवते. मुलांच्या डब्यावर, मोठ्यांना चहासोबत हे पदार्थ उत्तम ठरतात.
 
पचनास हलका असणारा ‘पोहा’ हा उत्तम न्याहारी तर आहेच, पण व्यवसायास श्रीगणेशा करण्यासही उत्तम आहे. झटपट कृती, कमीतकमी साहित्य यात भर घालतात. स्थानिक स्थळावर मिळणारे काही पदार्थ संपूर्ण भारतभर खाल्ले जातात. त्या पदार्थांना नेहमीच समजून टाळून देत असतो, पण त्याची चव मात्र बदलती असते.
 
१) तर्रीपोहे/मिसळ :
विदर्भातील तर्रीपोहे/मिसळ पोहे हे उत्तम पोह्यांचे प्रकार आहेत. चणे, वाटाणे वा मिसळ पोहा याची चव म्हणजे मस्तच आणि स्थानिक विदर्भाचा थाट त्या पोह्यांना येतो. नागपूर शहरापासून ते ग्रामीण भागात खेड्यापर्यंत हा प्रकार आवडीने खाल्ला जातो.
 
२) मुंबईचे कांदेपोहे :
स्वपणाची नगरी मुंबई, चोवीस तास जागणारी. या मुंबईला जागवणारं एक उत्तम खाद्य म्हणजे ‘कांदेपोहे’ आहे. या धावत्या नगरीला धावतपळत झटपट तयार होणारा, झटपट खाता येणारा, थोड विसावा देणारी म्हणजे ‘कांदे-पोहे’ची प्लेट आहे.
 
३) इंदोरी पोहे :
चटपटीत, चमचमीत, रुचकर असा हा प्रकार आहे. स्थानिक चव आणि पारंपरिक छटा आपल्याला आजही या पोह्यांमध्ये दिसून येते. असे विविध पोह्यांचे प्रकार आहेत. आपल्याला नेहमीचेच वाटणारे साधे पोहेदेखील एक उत्तम, रुचकर असा खाद्यप्रकार आहे. खाऊ गल्लीत भटकताना जर या पदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली, तर नक्कीच चव चाखा...