राजकीय पुढारी आणि त्यांचे आगळे-वेगळे छंद
   दिनांक :28-Mar-2019
 
 
 
 
 
राजकीय पुढारी आणि त्यांचे व्यक्तीमत्त्व म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती त्यांची तद्दन राजकीय प्रतिमा! त्यांची भाषणे, राजकीय हालचाली इ. मात्र राजकारण्यांच्या या राजकीय जीवनापलिकडे त्यांच्या राजकीय जीवनात या पुढार्‍यांचे विविध छंद आणि आवडी-निवडी यांच्याशी संबंधित अशा आयामांची फारच थोड्या जणांना कल्पना असते.
उदाहरणार्थ अटलजी त्यांच्या उमेदीच्या व धकाधकीच्या राजकीय व्यग्रतेत, पण त्यांनी आपला कवितेचा छंद मात्र अखेरपर्यंत जोपासला. त्यांच्या कविता राष्ट्रप्रेम, समर्पण, नवा उत्साह आणि नवनिर्मितीच्या प्रबोधनाने ओतप्रोत असत. नरिंसहराव स्पॅनिशसह विविध भारतीय भाषांमध्ये बोलण्याचा सराव करीत तर मुरली मनोहर जोशी भौतिकशास्त्राच्या प्रगतावस्येवर आजही विचार करीत असतात.
 

 
 
केरळचे माजी मुख्यमंत्री ई. के. नायनार निसर्गोचराचा अभ्यास करतात, मुरली देवरा ब्रिज खेळतात, सोनिया गांधींना जुना व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करायला आवडते तर लालकृष्ण आडवाणींना बार्बरा कार्टलँड आवडते.
ऑस्कर फर्नांडिस यांना योगासने करणे आवडायचे व आपल्या प्रवासात सुद्धा ते वेळात-वेळ काढून आपला योगासनांचा नित्यक्रम जारी ठेवत. भाजपा नेते विजयकुमार मल्होत्रा यांना सुरुवातीपासूनच गणितात रुची होती व आजही पक्षाच्या आर्थिक मुद्यांवर विचार-चर्चा करताना त्यांच्या या गणिती ज्ञानाचा व छंदाचा आजही फायदा होतो.
ओमर अब्दुल्ला फावल्या वेळात क्रिकेट खेळण्याची आपली आवड जरूर पूर्ण करतात. भाजपाचे विजय गोयल यांना पुरातत्व केंद्रांना भेट द्यायला आवडते. आपल्या खासदारकीच्या काळात त्यांनी देशांतर्गत पुरातत्त्व ठिकाणांचे संरक्षण-संवर्धन करण्याचा मुद्दा बराच लावून धरला होता हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
 
खासदार मििंलद देवरा यांनी गिटार वाजविण्याचा आपला छंद आजही जपला आहे. देशाचे अर्थकारण सांभाळणारे चिदंबरम घरी असले म्हणजे संपूर्णपणे घरगुती वातावरणात राहणेच पसंत करतात तर अमरिंसह घरी असले म्हणजे त्यांना िंहदी काव्य-साहित्य वाचणे आवडते.
 
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित यांचा नेहमीच गृह-सजावटीवर कटाक्ष असायचा, गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी कटाक्षाने दररोज व्यायाम-आसने करतात तर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चित्र काढणे अवडते व वेळ-मिळेल त्याप्रमाणे त्या कॅनव्हासवर रंग चितारत असतात.
राजकारणातील यादवांच्या छंदांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास उ. प्र. चे माजी मुख्यमंत्री मुलायमिंसह यादप तरुणपणी कुस्ती खेळत असत. कुस्तीचा आखाडा आणि लाल मातीची साथ त्यांनी आजही सोडलेली नसून जमेल तसे ते आखाड्यात तर जातातच शिवाय पक्षाच्या कार्यक्रमाशिवाय इतर उद्घाटनांमध्ये त्यांचे प्राधान्य असते ते कुस्तीसह विविध क्रिडा उपक्रमांच्या उद्घाटनांना! लालू प्रसाद यादवांना विविध प्रकारचे पदार्थ बनविण्यामध्ये रुची आहे. ही आवड ते घरगुती स्वरूपात तर कायम राखतातच शिवाय पक्ष कार्यकर्ता संमेलनात भोजनगृहात आवर्जून लक्ष घालतात.
थोडक्यात म्हणजे आपले राजकारणी-पुढारी त्यांच्या निवडणुकीसह असणार्‍या धकाधकीच्या राजकारणात सुद्धा संगीतापासून-स्वयंपाकापर्यंत तर क्रिकेटपासून कुस्तीपर्यंतचे आपले शोक कायम राखतात.