भारताने ज्या २२ ठिकाणांबद्दल सांगितले , तिथे कोणतेही दहशतवादी कॅम्प नाहीत- पाकिस्तान
   दिनांक :28-Mar-2019
इस्लामाबादः
 पाकिस्ताननं पुलवामा हल्ल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचं सांगितलं होतं.  भारताने ज्या २२ ठिकाणांबद्दल सांगितले  होते , तिथे कोणतेही दहशतवादी कॅम्प नाहीत. जर भारतानं मागणी केली, तर त्यांना त्या ठिकाणांचा दौरा करण्याची परवानगी आम्ही देऊ, असे पाकिसनाने म्हटले .

 
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानकडून ५४ जणांची चौकशी सुरू आहे. परंतु अद्याप कोणतेही धागेदोरे पाकिस्तानच्या हाती लागलेले नाहीत. आम्हाला जी माहिती मिळेल ती आम्ही नियमानुसार भारताला देऊ, भारताकडून सोपवण्यात आलेल्या पुराव्यांवरून पाकिस्तानशी या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट होतंय. भारतानं पुलवामा हल्ल्यासंदर्भात ताजे पुरावे दिल्यास आम्ही कारवाई करण्यास तयार आहोत, असंही पाकिस्ताननं सांगितले .
भारतानं दिल्लीस्थित पाकिस्तान उच्चायुक्तालयाला २७ फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्याच्यासंबंधी डोजियार सुपूर्द केले आहे. भारतानं पाकिस्तानकडे सोपवलेल्या डोजियारमध्ये हा हल्ला जैश-ए-मोहम्मद ने केल्याचे भक्कम पुरावे आहेत. पाकमध्ये जैशचे कॅम्प आणि त्या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या असल्याचाही पुराव्यांमध्ये उल्लेख आहेत.