'या' चित्रपटात रणबीर कपूरचा दिसणार डबल रोल
   दिनांक :28-Mar-2019
 
 
अनेक चित्रपटांमधून आपल्या भूमिकेला न्याय देणारा बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित बायोपिक मध्ये संजय दत्तची भूमिका साकारल्या नंतर त्याच्या करिअरला एक विशेष उंची प्राप्त झाली आहे. आता रणबीर त्याच्या आगामी चित्रपट 'शमशेरा'मध्ये  डबल रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो डाकूची भूमिका साकारणार आहे. रणबीर पहिल्यांदाच डबल रोल साकारणार असल्याने त्याला प्रचंड उत्सुकता आहे. 'शमशेरा'ची कथा ही स्वतंत्र्यपूर्व काळात घडते. आपल्या हक्कांसाठी ब्रिटीशांविरुद्ध लढणाऱ्या डाकूची कहाणी या चित्रपटात दाखवली जाणार आहे. याचे दिग्दर्शन करण मल्होत्रा करणार आहे.