शाहरुखच्या पार्टीत आमिरने नेला जेवणाचा डबा
   दिनांक :29-Mar-2019
 
 
चित्रपटात आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आमिर खान किती मेहनत घेतो हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. अश्यातच दंगल सिनेमादरम्यान घडलेला एक किस्सा आमिरने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. दंगल सिनेमात आमिरने पिळदार शरीरयष्टी असलेला कुस्तीपटू ते एक वयस्क बाप अश्या दोन भूमिका साकारल्या होत्या या वेळी त्याने त्याचा डायट फार कटाक्षाने पाळला.  नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमिरला तू पार्टीमध्ये गेल्यावर काय खातोस असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आमिरने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याने सांगितले होते की, मी जिथेही जातो, तिथे मी माझा जेवणाचा डबा सोबत घेऊन जातो आणि तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसत नसेल तर तुम्ही शाहरुखला विचारा. टीम कूक शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी आले होते. त्यांच्यासोबत अमेरिकेतील काही मित्र देखील होते. त्यावेळी गौरीने मला देखील त्यांच्यासोबत घरी जेवणासाठी बोलावले होते. 
 

 
 
 
मी नक्कीच जेवायला येईन असे मी त्यावेळी गौरीला सांगितले होते. तिथे गेल्यावर काही गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर जेवण वाढल्यानंतर गौरी मला जेवायला बोलवायला आली, त्यावर मी माझे घरचे जेवण आणले असल्याचे तिला सांगितले. त्यावर मी काहीतरी खावे असा गौरी सतत आग्रह करत होती. पण मी दंगलसाठी डाएटवर असल्याने मी केवळ माझ्या घरचे जेवण जेवतो असे मी तिला सांगितले. मी खूपच जास्त प्रमाणात माझ्यासाठी जेवण आले होते. ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.