नाना बनणार 'अन्ना'
   दिनांक :29-Mar-2019
 
हिंदी आणि मराठी चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटविल्या नंतर नाना पाटेकर तेलुगु चित्रपटात पदार्पण करू शकतात. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या 'नन्ना नेनू' या चित्रपटात नाना नकारात्मक भूमिका साकारणार असून, ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या संपर्कात असून, लवकरच या भूमिकेसाठी त्यांना निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. या भूमिकेसाठी नाना पाटेकर योग्य आहेत, असे श्रीनिवास यांना वाटते. यानंतर नाना पाटेकर याच्याशी चर्चा सुरू करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.