प्रत्येक निवडणूक लढविणार्‍या के. आर. गौरी
   दिनांक :29-Mar-2019
 
दत्तात्रय आंबुलकर  
 
 
केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या असणार्‍या के. आर. गौरी या 92 वर्षीय महिला कार्यकर्तीने 1957 पासून झालेल्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत उभे राहून प्रत्येक निवडणूक लढविण्याचा एक आगळा-वेगळा राजकीय विक्रम साधला आहे.
के. आर. गौरी यांच्या राजकारणाच्या प्रवासातील विक्रमी सुरुवात पण तसे पाहता एका राजकीय विक्रमाने झाली. 1957 मध्ये केरळमध्ये प्रथमच आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेल्या गौरी ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या मंत्रिमंडळातील पहिल्या महसूलमंत्री व महिला मंत्री बनल्या व नंबुद्रीपाद यांचे त्यावेळचे मंत्रीमंडळ-सरकार हे जगाच्या साम्यवाद आणि साम्यवाद्यांच्या इतिहासातील पहिले निर्वाचित मंत्रीमंडळ ठरले हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
 

 
 
 
त्यानंतरच्या सुमारे 50 वर्षांच्या आपल्या साम्यवादी राजकीय वाटचालीत के. आर. गौरींच्या ‘गौरी अम्मा’ झालेल्या या महिलेने अनेक राजकीय चढ-उतारांसह विविध उपक्रम-विक्रम केले आहेत हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. 92 वर्षीय गौरी अम्मा यांनी 1957 पासून म्हणजेच केरळ राज्याची निर्मिती झाल्यापासूनची प्रत्येक निवडणूक लढविली असून त्याआधी 1948 मध्ये त्रावणकोर येथून तर 1954 मध्ये कोचीन येथून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविली होती हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
गौरी अम्मा यांचे निवडणूकविषयक राजकीय वैशिष्ट्य म्हणजे 1957 पासून त्यांनी एकूण 16 सार्वजनिक निवडणुका लढविल्या असून त्यापैकी3 निवडणुका त्यांनी िंजकल्या तर केवळ 3 निवडणुकी त्या हरल्या व अशाप्रकारे त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात हार-जीत या संदर्भात 3113 या आकडेवारीला एक नवा आयाम पण दिला आहे. गौरी अम्मा यांचा निवडणुतील पराभव 1948, 1977 व 2006 या वर्षी त्यांनी लढविलेल्या निवडढणुकीत म्हणजेच दर 29 वर्षांनी झाला आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
गौरी अम्मांनी प्रसंगी मार्क्सवादी पक्षांशी झालेले आपले मतभेद लपवून न ठेवता स्वत:च्या ‘जनतिपथ्य संरक्षण समिती’ या राजकीय संघटनपेची स्थापना केली व 2001 मध्ये कॉंग्रेस नियंत्रित राजकीय आघाडीच्या नव्या मंत्रिमंडळात पण त्या नव्याने सामील झाल्या होत्या. परिणामी केरळमधील कम्युनिष्टांपासून - कॉंग्रेसपर्यंतच्या सर्वच राजकीय पक्ष-आघाड्यांसह काम करणार्‍या गौरीअम्मांना सर्वजण केरळच्या राजकारणातील ‘पोलादी महिला’ म्हणूनच संबोधित करतात.
आपल्या सुरुवातीच्या उमेदीच्या वा उमेदवारीच्या काळात पोलिसांनी बंदुकीसह त्यांना केलेल्या मारहाण आणि अत्याचारांच्या संदर्भात गौरीअम्मांची टिप्पणी म्हणजे ‘‘माझ्यावर माझ्या तरुणपणी पोलिसांनी पोलिसी बंदुकांच्या दस्त्यांनी एवढे अनन्वित अत्याचार केले होते की, मी त्यावेळी एखाद्या बंदुकीलाच जन्म दिला असता.’’ नंतरच्या काळात त्याच केरळी पोलिसांनी आपल्या बंदुकांसह मंत्री झालेल्या गौरीअम्मांना मानवंदना दिली हा भाग वेगळा!
आपल्या राजकीय प्रवासात गौरी अम्मांना मुख्यमंत्री पदाने दोन-वेळा थोडक्यात हुलकावणी देऊन पण त्यांना त्याचे राजकीय वैषम्य नाही. त्यांच्या मते त्यांनी त्यांचे समर्थक-कार्यकर्ते यांच्या सहकार्याने आजवर केलेली यशस्वी राजकीय वाटचाल मुख्यमंत्री पदापेक्षा कमी थोडीच आहे?