हुंदवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक; चार जवान शहीद
   दिनांक :03-Mar-2019
जम्मू-काश्मीर :
 जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा आणि बाबागुंड परिसरात सलग तिसऱ्या दिवशी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत चार जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले आहेत.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हंदवाडा परिसरात गेल्या गुरुवारपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या परिसरात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, परिसराला सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढा घातला असून शोधमोहीम सुरु आहे. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचारी शहीद झाले आहेत. तर नऊ जवान जखमी झाले असून यामध्ये दोन सीआरपीएफचे जवान आणि सात लष्कराचे जवान आहेत.