फ़ुटबाँल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार अजय देवगण
   दिनांक :03-Mar-2019
 क्रीडा विषयावरील जसे क्रिकेट, हॉकी यांसारख्या खेळांवरील बायोपिक चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिली. म्हणूनच आता बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहिम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘बधाई हो’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमित शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
 
 
 
मे किंवा जूनमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला आणि जॉय सेनगुप्ता करत असून अद्याप त्यांचे नाव जाहीर करण्यात आले नाही.
 
१९५०- १९६३ या कालावधीत सय्यद अब्दुल रहिम भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. हा काळ भारतीय फुटबॉलचा सुवर्णयुग मानला जातो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने १९६२च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते . त्यानंतर १९५६मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच मेलबर्न ऑलिम्पिक फुटबॉल टूर्नामेंटच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. वयाच्या ५४ व्या वर्षी अब्दुल रहिम यांचं कॅन्सरमुळेनिधन झाले.