मनोहर पर्रीकर वैद्यकीय चाचणींकरीता रुग्णालयात
   दिनांक :03-Mar-2019
पणजी 
 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आज सकाळी पुन्हा उपचारांसाठी गोमेकॉत आणण्यात आले आहे. विविध वैद्यकीय चाचण्या घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना घरी पाठविण्यात आले. सध्या त्यांच्यावर दोनापॉल येथे त्यांच्या खासगी निवासस्थानी उपचार सुरू आहेत.
 
 
गोमेकॉच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्रीकर यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. अंतर्गत रक्तस्राव चालू आहे का हे तपासण्यासाठी काही चाचण्या घेण्यात आल्या. सर्व काही नियंत्रणात असल्याचा दावा सूत्रांनी केला. पर्रीकर फेब्रुवारी २०१८ पासून दुर्धर आजाराने त्रस्त असून गोवा, मुंबई, दिल्ली तसेच अमेरिकेतही त्यांच्यावर उपचार झालेले आहेत.