कारंजा येथे खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन
   दिनांक :03-Mar-2019
 
 
कारंजा घाडगे : येथे भव्य राज्यस्तरीय बालगट खंजरी भजन स्पर्धेचे उदघाटन मोठ्या थाटात पार पडले.  स्पर्धेचे आयोजन गुरूदेव अमृतगिरी महाराज बाल भजन मंडळ व गुरूदेव सांस्कृतिक कला क्रीडा भजन मंडळ कारंजा घाडगे यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. स्थानिक जयस्तंभ चौक परीसरात हा उदघाटन सोहळा पार पडला. कावळे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उदघाटन नितीन दर्यापुरकर यांचे हस्ते करण्यात आले.     
 

 
 
नव्या युगात खंजरी भजनातून भक्तीचा मार्ग महाराजांनी दाखविला असून भजन काळजाचे ठाव घेण्यासाठी आहे असे विचार कावळे महाराजांनी मांडले. तुकडोजी महाराजांनी रूढीपरंपरावादी अंधश्रध्दा,जातीभेद निर्मूलनासह समाज प्रबोधनासाठी गावागावात जाऊन खंजरी भजने सादर केली असे विचार मुख्याध्यापक विलास वानखडे यांनी मांडले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.