देसाईगंजमध्ये भाजपाची रैली
   दिनांक :03-Mar-2019

कार्यकर्त्यांनी घेतला पुन्हा केन्द्रात भाजपची सत्ता स्थापण्याचा संकल्प
 
देसाईगंज :  देसाईगंज तालुका भाजपच्या वतिने आज विजय संकल्प अभियान मोटार सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले. या रैलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोदी शासनाद्वारे जनकल्यानकारी योजनांची माहिती देनाऱ्या फलकासह  मोदी सरकार जिंदाबाद, भारत माता की जय अश्या घोषणा दिल्या, पुन्हा केन्द्रात भाजपची सत्ता स्थापण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी या मोटार सायकल  रैलीच्या माध्यमातुन केला. या रैलीत आमदार  क्रिष्णा गजभे,ता,अध्यक्ष राजुभाऊ जेठानी, शहर अध्यक्ष जोतु तेलतुंबडेसह अनेक कार्यकर्ते सामील झाले होते.