आजचे राशी-भविष्य दिनांक ३ मार्च २०१९
   दिनांक :03-Mar-2019
 
 
मेष : ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. कुठल्याही गोष्टीच्या अति आहारी जाणे टाळा. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. उसने देतांना सावधगिरी बाळगा.   
 
वृषभ : आजचा दिवस विश्रांतीचा दिवस ठरेल. वाद वाढेल असे काही बोलू नका. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. धार्मिक कार्यात मन रमेल. 
मिथुन : करायला गेलो काय आणि वरती झाले पाय ! असा काहीसा अनुभव आज तुम्हाला येण्याची शक्यता आहे. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे. गरिबाला अन्नदान करा. पांढरे वस्त्र परिधान केल्याने मानसिक त्रास कमी होण्यास मदत मिळेल. 
 
 
कर्क : आज एखादा सुखद धक्का तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. जुन्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीत मन रमेल. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दही भाताचे सेवन केल्याने दिवसभर प्रसन्न वाटेल.  
 
 
िंसह : तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. आप्तेष्टांसोबत वादविवाद होतील. केलेल्या कामाचा पश्चताप होईल. मिळेल त्यात समाधान माना. लाल रंगाचे वस्त्र परिधान करू नये.   
 
कन्या : महत्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस आहे. दुपारी ३ नंतर आर्थिक व्यवहार करू नये. अन्नदान केल्याने कामे मार्गी लागतील.  
 
 तूळ : आळस झटकून कामाला लागा अन्यथा हाती आलेली संधी गमवावी लागेल. बोलतांना मागचा पुढचा विचार करून बोला. अनावश्यक साहस टाळा. आजचा दिवस मानसिक तणावाचा राहणार आहे. 
 
वृश्चिक : सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतील. जुनी उसनवारी वसूल होईल. कामात मन रमेल. संयमाने परिस्थिती हाताळाल.  


धनू : हलगर्जी पणामुळे हाती आलेली संधी तुम्ही गमावणार आहात. पैशाची चणचण भासेल. दिवसाच्या उत्तरार्धानंतर महत्वाच्या योजना आखाल. महादेवाला बेल वाहिल्याने कष्ट कमी होतील.  
 
 
मकर : अंथरून पाहून पाय पसरण्याची सवय लावा. प्रलोभनांपासून दूर राहा. काम निमित्य प्रवास संभवतो. अनुभवी लोकांचा सल्ला महत्वाचा ठरेल.   
 
 
कुंभ : दिवस समाधानकारक असेल. येणाऱ्या आव्हानांवर सहज मात कराल. दिलेला शब्द मोडणार नाही याची काळजी घ्या. नवीन व्यावसायिक संधी चालून येईल. 
 
मीन : मी पणामुळे दुसरा दुखावणार याची काळजी घ्या. देवा समोर तुपाचा दिवा लावा. गेलेली वेळ परत येत नाही म्हणून निर्णय योग्य त्या वेळेतच घ्या. एकंदरीत दिवस समाधानकारक जाईल.