बारावी परीक्षेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
   दिनांक :03-Mar-2019
१२ वीच्या बोर्ड परिक्षेचा पेपर देताना एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी हैदराबाद येथे ही घटना घडली. पेपरआधी त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती पण रुग्णालयात जाण्यास नकार दिला होता. मृत विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

 
 
गोपी राजू (वय-१९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो चैतन्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. परिक्षेला जाताना त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, मात्र परिक्षेसाठी उपस्थिती लावणे महत्वाचे असल्याने त्याने रुग्णालयात जाण्यास नकार दिला होता. थोड्यावेळाने तो परीक्षा केंद्रावर पोहोचला, पण स्वतःच्या बेंचजवळ पोहोचताच तो खाली पडला. तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.