मसूद अजहर हवाई हल्यात ठार? पाकी माध्यमांमध्ये चर्चा
   दिनांक :03-Mar-2019
 
इस्लामाबाद: जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र अद्याप पाकिस्तान सरकारने  याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त पाकिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे.
 
 
सैन्य तज्ज्ञांच्या मते, 'भारताने केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये मसूद अजहर गंभीर जखमी झाला होता. त्याला पाकिस्तानातील लष्करी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याच्या मृत्यूचे श्रेय भारताला मिळू नये म्हणून पाकिस्तानने अजहरचा मृत्यू लिव्हर कॅन्सरने झाले असल्याचे खोटे कारण दिले आहे.'