कुंभमेळ्यातील शेवटचे पर्व स्नान उद्या
   दिनांक :03-Mar-2019
प्रयागराज,
मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर गेल्या १५ जानेवारी रोजी प्रयागराज येथे सुरू झालेल्या कुंभमेळ्यातील शेवटचे पवित्र स्नान उद्या सोमवारी महाशिवरात्रीच्या पर्वावर आयोजित करण्यात आले आहे. सुमारे दोन कोटी भाविक उद्या पवित्र त्रिवेणी संगमात डुबकी घेण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २२ कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात डुबकी घेतली आहे.
 
 
 
कुंभमेळ्यातील शेवटच्या पर्व स्नानाकरिता कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, अतिरेकी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन संशयित हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचीही मदत घेण्यात येत आहे. उपासक आणि शिवभक्त या पर्व स्नानानंतर आपापल्या गावी परतणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
या पर्व स्नानाबाबत अशी आध्यायिका आहे की, महाशिवरात्रीच्याच दिवशी भगवान महादेवाचा विवाह झाला होता, त्यामुळे शिवभक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो.