निवडणुकीपूर्वी म्हाडा काढणार १४ हजार घरांची लॉटरी !
   दिनांक :03-Mar-2019
एकाच डिपॉझिटमध्ये कितीही घरांसाठी करता येणार अर्ज  
 
मुंबई : स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांची आनंदाची बातमी आहे. म्हाडातर्फे घरे तसेच गाळ्यांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून विशेष म्हणजे एकाच डिपॉझिट रकमेमध्ये यंदा कितीही घरांसाठी अर्ज करता येणार आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून बंद असणाऱ्या दुकानांचे लिलाव यातून करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहिती नुसार म्हाडा यंदा  २१७ घरे आणि २७६ गाळ्यांसाठी जाहिरात काढणार आहे.  यामुळे म्हाडाच्या तिजोरीत दिडशे कोटींची भर पडणार आहे .
 

 
 
म्हाडाच्या योजनांमुळे आज कित्येक कुटुंबाचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. म्हाडा नेहमीच नागरिसांठी सवलीती काढत असतात. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात घरे घेणाऱ्यांसाठी एक योजना आखण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हाडा लॉटरी द्वारे १४ हजार घरांचे वाटप करणार आहे. 
 मिळालेल्या माहिती नुसार म्हाडा तर्फे मुंबईत  २३८ घरे आणि १०७ दुकाणांची घोषणा करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये १००० घरे पुण्यात ४४६४ घरे, औरंगाबादमध्ये ८०० आणि कोकणात  ९००० घरांच्या लॉटरीची घोषणा करण्यात येणार आहे.