सावित्रीबाई फुले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
   दिनांक :03-Mar-2019
नवी दिल्ली: उत्तरप्रदेशच्या बहराईच लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या आणि आता भाजपासोबत बंडखोर करणार्‍या खासदार सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियांका वढेरा आणि पश्चिम उत्तरप्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सावित्रीबाई यांच्यासोबतच समाजवादी पार्टीचे माजी खासदार राकेश सचान यांनीही काँग्रेसससोबत हातमिळवणी केली आहे. राकेश सचान समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमिंसह यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते फतेहपूरचे माजी खासदार आहेत.
 
 

 
सावित्रीबाई फुले यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भाजपाला रामराम ठोकला होता. परंतु, त्यांनी त्यावेळी आपण कोणत्या पक्षात जाणार, हे जाहीर केले नव्हते. खासदार सावित्रीबाई फुले यांनी, भाजपा समाजात दुही निर्माण करीत असल्याचा आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती. यासह त्यांनी राममंदिर आणि दलितांवरील हल्ल्यांवरून भाजपाला लक्ष्य केले होते. सोबतच त्यांनी आयुष्यात कधीही भाजपासोबत जाणार नसल्याचेही जाहीर केले होते.