राफेलची कमतरता आज देशाला जाणवत आहे- नरेंद्र मोदी
   दिनांक :03-Mar-2019
भारताकडे राफेल विमाने असती, तर देशाने बरीच मोठी कामगिरी केली असती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमात केले. आज भारत एका सुरात बोलत असून, आपल्याकडे राफेल असते तर काय घडू शकले असते याची चर्चा करत आहे, असे मोदी म्हणाले. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानखरेदीचे मोदींनी समर्थन केले.
 
 
 
 
शनिवारी नवी दिल्लीमध्ये इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राफेल सौद्यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना या व्यवहाराचे समर्थन करत मोदींनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राफेल वादाचा उल्लेख करत ते म्हणाले, राफेलवरील स्वार्थी राजकारणापायी देशाचे मोठे नुकसान झाले आहे. राफेलची कमतरता आज देशाला जाणवत आहे.