कसबा पेठ मेट्रो स्टेशनला पुणेकरांचा विरोध
   दिनांक :03-Mar-2019
-कसबा गणपती मंदिरासमोर स्थानिकांनी केली निदर्शने 
 
पुणे : पुण्याच्या विकासाला गती देणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे  काम युद्धपातळीवर सुरु असताना कसबा पेठेतील रहिवाश्यांनी मात्र याला विरोध केला आहे. पुण्याचा मध्यभाग समजल्या जाणाऱ्या कसबा पेठमध्ये मेट्रोचे स्टेशन होणार आहे. मात्र याठिकाणी स्टेशन तयार करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध करीत कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन केले.
 
 
 
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात कसबा पेठेत मेट्रोचे स्टेशन होत आहे. यामध्ये २०० ते ३०० कुंटुंबांना स्थलांतरित करावे लागणार आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याचा सर्व्हे केला असून या स्टेशनमुळे येथील स्थानिकांच्या कुटुंबियांसह ऐतिहासिक स्थळांनाही धक्का लागणार असल्याने याठिकाणी मेट्रो स्टेशन होऊन नये भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे.