संयुक्त राष्ट्राकडून विंग कमांडरचे अभिनंदन
   दिनांक :03-Mar-2019
न्यूयॉर्क :
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस आँटोनिओ ग्युटेरेस यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, दोन्ही भारत-पाकिस्तान या देशांनी आपापसात 'सकारात्मक कृती' ठेवावी आणि रचनात्मक संवाद साधावा, असे आवाहन केले आहे.
 
 
विंग कमांडर यांची पाकिस्तानने शुक्रवारी सुटका केल्यानंतर अभिनंदन यांचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. 'मिग २१' विमान कोसळल्यानंतर अभिनंदन गेल्या ६० तासांपासून पाकिस्तानच्या ताब्यात होते. शुक्रवारी अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर ग्युटरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी याबद्दल अभिनंदन केले आहे.