जर्मनीत भारतीयाची चाकूने भोसकून हत्या
   दिनांक :30-Mar-2019
नवी दिल्ली
जर्मनीतील म्युनिकमध्ये एका अज्ञात इसमाने केलेल्या चाकू हल्ल्यात भारतीयाची हत्या करण्यात आलीय. तर त्याची पत्नी जखमी झालीय. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याची माहिती ट्विटरवरून दिलीय.

 
 
प्रशांत आणि स्मिता बसरूर या जोडप्यावर एका अज्ञाताने चाकूने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रशांत यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी स्मिता ही जखमी झाली. स्मिता यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. जर्मनीत पोहोचण्यासाठी आम्ही प्रशांत यांच्या भावाला मदत करत आहोत, अशी माहिती देत स्वराज यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करून कुटुंबाचं सांत्वन केलंय.
  
 
प्रशांत आणि स्मिता यांना दोन मुलं आहेत. या मुलांची काळजी घेण्याचे आदेश भारतीय दुतावासाला देण्यात आलेत, असंही स्वराज यांनी सांगितलंय. दरम्यान, भारतीय जोडप्यावर हल्ला कुठल्या कारणावरून झाला. हल्ला कोणी केला?, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.