आजचे राशी भविष्य, दि. 30 मार्च २०१९
   दिनांक :30-Mar-2019
 
मेष : आज आपणाला थकवा, आळस आणि व्यग्रता जाणवेल. उत्साह वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीत राग येईल. त्यामुळे कामात बिघाड होईल. नोकरी, व्यापाराच्या जागी किंवा घरात आपणामुळे दुःख होणार नाही याची काळजी घ्या.
 
वृषभ :  खाण्या- पिण्यावर विशेष लक्ष द्या. तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. शक्य असेल तर प्रवास टाळा. आज नियोजीत वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही. योग, ध्यानामुळे मानसिक शांतता मिळू शकेल.      
 
मिथुन : आजचे ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे राहणार आहे, त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागणार आहे. व्यवहारात अतिशय सावध राहावे लागणार आहे. दुसऱ्यांवर विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. काही गोष्टींची अनुकूलता मिळणार आहे. व्यवहारात फार मोठ्या उलाढाली करण्याचे कारण नाही.
 
कर्क : अनेक क्षेत्रांत आपले वेगळेपण दाखवून देऊ शकाल. वाढणारी आवक, कामाचा वाढता व्याप यासारख्या गोष्टींमुळे विविध क्षेत्रांत प्रगतीची वाटचालाची संधी मिळेल. नोकरदारांना आपले नैपुण्य दाखविता येईल. बढतीच्या मार्गाने पुढे जाता येईल. 
 
सिंह : आज तरुणांना नोकरी-व्यवसायात कामाचा ढीग उपसावा लागणार आहे. व्यवसायाचा नवा मार्ग हाती येईल. मात्र नवीन गुंतवणूक सहजपणे करणे हितकारक नसणार आहे. कौटुंबिक काही नवे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता राहील, तेव्हा दक्ष राहा.
 
कन्या : राजकारण, समाजकारण, आर्थिक बाजू आणि व्यवसाय क्षेत्रातील मित्रमंडळी अशा आघाड्यांवर आपला पगडा दिसून येईल. अपेक्षित यशासाठी आपणास फार मोठ्या उलाढालींची आवश्यकता राहणार नाही. आपल्याकडून चुका होणार नाहीत याची खास दक्षता घ्या.
 
तूळ : कोणाला आपल्या बोलण्याने वाईट वाटेल असे बोलणे टाळल्यास आणि प्रकृतीची काळजी घेतल्यास दिवस लाभदायक राहील. उधारी वसूल होईल. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि व्यावसायिक संबंध सुधारू लागतील. आरोग्याच्याबाबत मात्र कोणतीही चालढकल करू नका.
 
वृश्चिक : आजचा दिवस संयमाचा, शांततेचा असल्यास आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकाल. आपल्या समाजकार्याचा लाभ होणार असून आपण केलेल्या मदतीने आपले संबंध अधिक चांगले व दृढ होऊ शकतील. नोकरांना बऱ्यापैकी दिवस आहेत, वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल.
धनु : नोकरदारांना दिवस ठीक राहील. विवाहइच्छुकांचे अचानक योग संभवतात. नोकरीतील दृष्टचक्र संपण्याचे संकेत मिळतील. आपल्या जोडीदाराचे वैयक्तिक प्रश्न सोडविता येतील. धार्मिक उपक्रमांतून मानसिक शांतता लाभेल.
मकर : कोणाला आपल्या बोलण्याने वाईट वाटेल असे बोलणे टाळल्यास आणि प्रकृतीची काळजी घेतल्यास दिवस लाभदायक राहील. उधारी वसूल होईल. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि व्यावसायिक संबंध सुधारू लागतील. आरोग्याच्याबाबत मात्र कोणतीही चालढकल करू नका. 
 
कुंभ : आर्थिकदृष्ट्या दिवस आपल्यासाठी ठीक राहील. पण त्याचबरोबर सततच्या एकसारख्या कामाचा कंटाळा आल्याने दिवस काहीसा नाराजीचा जाईल. आरोग्याच्याबाबत स्वतःकडे लक्ष देण्याची गरज राहील. वैवाहिक क्षेत्रात आपल्या जोडीदारावर अधिक लक्ष द्यावे लागेल. मुलांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लावता येतील.
 
मीन : बऱ्याचदा हाताशी आलेल्या यशाला हुलकावणी दिल्याचे काही अनुभव आपणास येऊ लागतील. आपले शारीरिक स्वास्थ्य जपणे हे फार महत्त्वाचे ठरणार आहे, विशेषतः मधुमेह, श्वसनाचे विकार, मूत्रविकार यांसारख्या विकार असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता राहील.