जान्हवी कपूर साकारणार डबल रोल
   दिनांक :30-Mar-2019
मुंबई:
'धडक'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरला आणखी एक सिनेमा मिळाला आहे. राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्या 'रुह-अफजा' या हॉरर सिनेमात ती चमकणार असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे जान्हवी यात डबल रोल साकारणार आहे.

 
 
'रुह-अफजा' या चित्रपटाचं शूटिंग लवकरच उत्तरप्रदेशात सुरू होणार असून, तो मार्च २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात रूही आणि अफजा या दोन्ही व्यक्तिरेखा जान्हवी साकारणार आहे. या दोन्ही भूमिका एकमेकींहून एकदम भिन्न असतील. श्रीदेवी यांनी 'चालबाज'मध्ये अशा प्रकारची भूमिका साकारली होती. 'रुह-अफजा' चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक मेहता करणार असून चित्रीकरण जूनमध्ये सुरू होणार आहे.