प्रियांका आणि निकचा होणार घटस्फोट
   दिनांक :30-Mar-2019
मुंबई,
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनस ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. निक आणि प्रियांकाचे फोटोही व्हायरल होत असतात. परंतु, प्रियांका आणि निक आता घटस्फोटाच्या तयारीत असल्याचा दावा ओके मॅगझिनने केला आहे.
 
 
प्रियांका आणि निक यांच्यात खटके उडू लागल्याची चर्चा आहे . ओके मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाचा रागीट स्वभाव आणि निकचे आयुष्यावर नियंत्रण ठेवणं त्याला पसंत नाही. निकसोबत जोनस कुटुंबीयांनाही प्रियांकाचं वागणं आता खटकायला लागलंय. जोनस कुंटुंबाला प्रियांका समंजस महिला वाटली आणि ती मुलाबाळांना जन्म देउन सुखाचा संसार करेल वाटले होते. मात्र प्रियांकाचा वास्तवात व्यवहार हा २१ वयाच्या मुलीसारख्या असल्याचे कुंटुंबाने म्हटले असल्याचे मॅगझिनमध्ये लिहिले आहे. जर निक आणि प्रियांकामध्ये घटस्फोट झाला तर संपत्तीचा मोठा विवाद उद्भवण्याची शक्यताही या मॅगझिनने वर्तवली आहे. परंतु, या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण प्रियांकाच्या टीमनं दिलं आहे. तसेच ओके मॅगझिन निक आणि प्रियांकाबद्दल अनेकदा खोट्या बातम्या पसवरत असल्याचेही म्हटले आहे.