'टायगर ३' साठी सलमान-कतरिना पुन्हा एकत्र?
   दिनांक :30-Mar-2019
मुंबई,
सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी नेहमीच चर्चेत असते. बऱ्याच सिनेमांमध्ये ते एकत्र झळकले आहेत. कॅट आपली आवडती सहकलाकार आहे, सलमान नेहमी सांगत असतो. लवकरच त्यांचा 'भारत' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तसंच 'टायगर'च्या तिसऱ्या भागातही ही जोडी एकत्र झळकणार असल्याचं कळतंय.
 
 
'टायगर ३'साठी कतरिना आणि सलमानशी बातचीत सुरू होती. परंतु, दोघांकडून अधिकृतरित्या होकार कळवण्यात आला नव्हता. चित्रपटाच्या टीममधील सूत्रानं एका दिलेल्या माहितीनुसार, 'टायगर ३'मध्ये सलमान आणि कतरिनाची जोडी झळकणार आहे. कतरिनानं चित्रपटासाठी होकार कळवलाय. सलमानच्या उत्तराची वाट निर्माते -दिग्दर्शक पाहत होते. पंरतु, नुकताच सलमाननेदेखील चित्रपटासाठी होकार कळवला आहे.
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी 'टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्हीही सिनेमांचं दिग्दर्शन केले होतं. तसंच 'भारत'चं दिग्दर्शनही तेच करताहेत. त्याचं काम संपलं की लगेचच 'टायगर ३'साठी त्यांची जुळवाजुळव सुरू होईल.